Category कुडाळ

भातशेती नुकसानीचे पंचनामे १० ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करा!

जि.प.कृषी समिती सभेत सभापती दादा साईल यांचे निर्देश सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती गंभीर बनली असताना नुकसानीच्या पंचनाम्यांना संथ गती असल्याने जि.प. कृषी समितीच्या बैठकीत कृषी समिती सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज प्रशासनाला धारेवर…

कमिशनच्या आमिषाने बँक खाते दिले; कुडाळातील तिघे गुजरात पोलिसांच्या ताब्यात!

संशयास्पद व्यवहारांचा तपास; कुडाळमध्ये खळबळ बँक खाते अनोळखी व्यक्तीला देऊ नका; पोलिसांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी        कमिशनच्या आमिषापोटी स्वतःचे बँक खाते अनोळखी व्यक्तींना वापरण्यास दिल्याने कुडाळ तालुक्यातील एका फर्मच्या तीन संचालकांना गुजरात पोलिसांनी नाट्यमयरित्या ताब्यात घेतले. या खात्यांमधून काही संशयास्पद…

अटकेची भीती दाखवून कुडाळात रेल्वे कर्मचाऱ्याला अज्ञातांकडून ४.६० लाखांचा गंडा!

कुडाळ पोलीसांकडून तपास सुरू कुडाळ : बँक खात्यावर संशयास्पद व्यवहार झाल्याचे सांगून अटक करण्याची भीती दाखवत अज्ञात व्यक्तींकडून कुडाळ येथील रेल्वे कर्मचाऱ्याची ४ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अटक टाळण्यासाठी सांगितलेल्या खात्यावर पैसे जमा…

नेरूरपार जेटी येथे अनधिकृत वाळू होड्यांवर कुडाळ महसूल विभागाची कारवाई!

तीन भरलेल्या होड्या नदीपात्रात बुडविल्या; दोन होड्या प्रवाहाबरोबर सोडून देण्यात आल्या कुडाळ : कुटगाव येथील नेरूरपार जेटी परिसरात आज दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने अनधिकृत वाळू उपशाविरोधात कारवाई केली.      उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या…

कुडाळ शहराच्या कचरा प्रश्नावर सकारात्मक तोडगा; नगराध्यक्षांच्या प्रयत्नांना यश!

शहरातील कचरा संकलन आजपासून सुरळीत सुरू नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेलकर-शिरवलकर यांची माहीती कुडाळ : कुडाळ शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने निर्माण झालेल्या अडचणीवर नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांनी प्रशासनाच्या सहकार्याने सकारात्मक तोडगा काढण्यात यश मिळविले आहे. सांगीर्डेवाडी येथील घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरात…

झाराप-मुंडयेवाडी येथे विहिरीत पडलेल्या खवले मांजराची सुखरूप सुटका; ग्रामस्थांची तत्परता!

वन्यजीव संरक्षणाचा आदर्श; वनविभागाकडून ग्रामस्थांचे कौतुक कुडाळ : वन्यजीव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर वनविभागामार्फत सुरू असलेल्या जनजागृती व सेवा संकल्प अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, झाराप-मुंडयेवाडी येथे आज विहिरीत पडलेल्या खवले मांजराची स्थानिक ग्रामस्थांनी सुखरूप सुटका केली.    झाराप-मुंडयेवाडी येथील प्रविण रेडकर यांच्या…

बालकांचे पोषण, आरोग्य आणि योग्य आहारासाठी कुडाळात जनजागृती रॅली; अंगणवाडी सेविकांचा उत्स्फूर्त सहभाग!

पोषण माहनिमित्त कुडाळात जनजागृतीचा जागर; आहारातील विविधता, प्रथिने आणि तृणधान्यांचा संदेश कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) प्रकल्प, कुडाळ यांच्यातर्फे नवव्या ‘पोषण माह’ अभियानानिमित्त लहान मुलांचे पोषण, आरोग्य आणि योग्य आहाराबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी कुडाळ शहरात आज…

कुडाळात प्राथमिक शिक्षकांचे लाक्षणिक आंदोलन; प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी!

‘शिक्षकांचा वेळ ऑनलाइन कामात नव्हे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी द्या’; शिक्षकांचा एल्गार स्वयंपाकींचे प्रलंबित मानधन, पाठ्यपुस्तके, वेतनासह विविध मागण्यांसाठी आंदोलन कुडाळ : तालुक्यातील प्राथमिक शिक्षक व शालेय व्यवस्थेशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कुडाळच्या…

कुडाळमध्ये पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नगरपंचायत सज्ज; बंधारे, विहिरींचा गाळ उपसा अन् टँकरचे नियोजन!

पाणीटंचाई रोखण्यासाठी नगरपंचायतीचा ‘ॲक्शन प्लॅन’ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अर्धा तास पाणी कपातीचा निर्णय कुडाळ : चालू वर्षातील हवामानातील बदल आणि संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, कुडाळ शहरात आगामी काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कुडाळ नगरपंचायत प्रशासनाने ठोस आणि…

एसटीच्या तांत्रिक त्रुटींचा भुर्दंड महिलांना का? बाळा पावसकरांचा सवाल!

महिला प्रवाशांकडून पूर्ण भाडे वसुली थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन ठाकरे शिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर यांचा इशारा कुडाळ : राज्य सरकारने महिलांसाठी एसटी प्रवासात सवलती जाहीर केल्या असल्या, तरी प्रत्यक्ष प्रवासादरम्यान तांत्रिक त्रुटींचा फटका महिला प्रवाशांना सहन करावा लागत आहे.…

error: Content is protected !!