Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

सिंधुकन्या प्राजक्ता गवाणकरची सहाय्यक अभियंता (राजपत्रित) पदावर निवड!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यशस्वी ठरलेली एकमेव महिला उमेदवार स्पर्धा परीक्षेत सातत्यपूर्ण मेहनतीमुळे कुडाळच्या प्राजक्ता गवाणकरची अभिमानास्पद कामगिरी कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ येथील कु. प्राजक्ता राजाराम गवाणकर हिची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार एमपीएससी मार्फत सहाय्यक अभियंता वर्ग २ (राजपत्रित) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण…

कुडाळमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त ‘जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रम!

९ मार्च रोजी महिलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह सन्मान सोहळा आ.निलेश राणे यांची संकल्पना; शिवसेना महिला आघाडीचे आयोजन – सौ.दीपलक्ष्मी पडते यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी       ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुडाळ येथे महिलांसाठी विविध उपक्रमांनी भरलेला “जागर…

फोंडाघाटचा अमित कदम ठरला स्वस्तिक श्री स्वास्तिक श्री 2026 चा मानकरी!

कुडाळचा ज्ञानेश्वर आळवे ठरला स्वस्तिक श्री मेन फिजिकचा मानकरी कुडाळ येथे प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात रंगली जिल्हास्तरीय स्वस्तिक श्री शरीरसौष्ठव स्पर्धा कुडाळ : प्रतिनिधी      महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अससोसिएशन संलग्न सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स अससोसिएशनच्या मान्यतेने स्वस्तिक प्रतिष्ठान कुडाळ आयोजित ड्रुग्स मुक्त सिंधुदुर्ग…

कुडाळ नगरपंचायतीवर भगव्याची पुनरागमन मोहीम..?

शिंदे शिवसेना – भाजप महायुतीची रणनिती ठरतेय कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच राजकीय वातावरण तापू लागले आहे. सध्या नगरपंचायतीवर सत्ता असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्ष यांच्या महायुतीने पुन्हा एकदा कुडाळवर भगवा फडकविण्याचा निर्धार केला आहे.…

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान!

जिल्हाभरात ७ मार्च रोजी शिबिरांचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची माहीती सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात ७ मार्च रोजी एक दिवसीय शिबिरांचे मंडळ स्तरावर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘गाळमुक्त नदी’ मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करा!

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश; दूरदृश्य प्रणालीव्दारे घेतला आढावा जिल्हा गाळमुक्त करणार; संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त करणे अत्यावश्यक असून, ‘गाळमुक्त नदी’ मोहिमेचे…

चाफेलीतील जंगलात ‘सप्तरंगी’ची मुळे व फांद्या जप्त; आरोपी विठ्ठल लगड यांना अटक

कुडाळ वनविभागाची धडक कारवाई कुडाळ : प्रतिनिधी        सावंतवाडी वनविभाग अंतर्गत कुडाळ वनपरिक्षेत्रातील चाफेली वन परिमंडळामध्ये नेरूर कर्याद नारूर पश्चिम नियतक्षेत्रातील शासकीय राखीव जंगलात ‘सप्तरंगी’ या औषधी वनस्पतीची अवैध तोड करून मुळे काढून वाहतूक करणाऱ्या इसमास वनविभागाने अटक केली आहे. या…

रस्त्याच्या झाडीचा बळी; रूपेश पावसकरांचा कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागावर थेट आरोप!

कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेत केली चौकशीची मागणी कुडाळ : प्रतिनिधी     दि.२ मार्च २०२६ रोजी कुडाळ – नाबरवाडी येथे अपघात घडला व त्यात नेरूर येथील नीलिमा निलेश मेस्त्री यांचा हकनाक बळी गेला याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम…

सिंधुदुर्गात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध!

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी     मध्यपूर्व आशिया तसेच आखाती देशांमध्ये  सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर…

कणकवली ठाकरे शिवसेना शाखेत ६ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती होणार साजरी!

पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली : प्रतिनिधी          शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत शुक्रवार दि. ०६ मार्च २०२६ रोजी शिवजयंती ( तिथीप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन…

error: Content is protected !!