Category कुडाळ

‘एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही’; पालकमंत्री नितेश राणेंचे शेतकऱ्यांना आश्वासन!

बेळणे खुर्दमध्ये पाण्याअभावी भातशेती संकटात; पालकमंत्री नितेश राणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांशी साधला संवाद; जास्तीत जास्त मदतीचे आश्वासन सिंधुदुर्गनगरी : पावसाचा प्रदीर्घ खंड आणि पाण्याअभावी भातशेती करपण्याची परिस्थिती निर्माण झालेल्या भागातील बेळणे खुर्द गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री नितेश राणे…

सर्व मिळून दुष्काळावर मात करूया; बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीला प्राधान्य!

पालकमंत्री नितेश राणे यांचा दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा; जिल्ह्यात १० हजार कच्चे बंधारे उभारण्याचे निर्देश प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपाययोजना कराव्यात – मंत्री राणे सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकजुटीने काम करून मात…

पर्यटनाला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड!

(दि. २७ सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन विशेष लेख) लेखन – सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग : संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेनुसार या वर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाची मध्यवर्ती संकल्पना पर्यटनाचे स्वरूप बदलण्यासाठी ‘डिजिटल अजेंडा’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अशी…

कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियमची कु. आहना पालव बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय!

१४ वर्षांखालील गटात उल्लेखनीय कामगिरी; सांगली येथील विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड कणकवली : कणकवली येथील समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियमची १४ वर्षांखालील गटातील कु. आहना पालव हिने दमदार कामगिरी करत द्वितीय…

सिंधुदुर्गातील आठही तालुके दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’ मध्ये!

पालकमंत्री नितेश राणे उद्या घेणार सविस्तर आढावा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     पावसाची तूट आणि खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचा मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसला असून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आठ तालुक्यांचा दुष्काळ व्यवस्थापनाच्या ‘Trigger-1’ अर्थात ‘पहिल्या कळ’मध्ये समावेश झाला आहे. राज्यातील तब्बल २६५…

सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांत दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू!

पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्हा प्रशासनाला पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्यात जमीन महसूलात सूट, पीक कर्ज पुनर्गठनासह विविध सवलती सिंधुदुर्गनगरी : खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे निदर्शनास…

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; सोमवारी ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडी देणार कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन!

शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात तसेच त्यांच्या राजीन्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी, दि. २८…

‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; सिंधुदुर्गात अकरा दिवसांच्या गणरायांना निरोप!

ढोल-ताशांचा गजर; फटाक्यांची आतषबाजी अन् भक्तिमय वातावरण बाप्पाचा जयघोष सिंधुदुर्ग : ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषात, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गुरुवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अकरा दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शहरापासून ग्रामीण…

महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल उपलब्ध

कुडाळ तालुक्यातील पात्र महिलांनी अर्ज करण्याचे तालुका कृषी अधिका-यांचे आवाहन कुडाळ : राज्यातील महिला शेतकऱ्यांना अधिकृत मान्यता देऊन त्यांना विविध शासकीय योजना, कार्यक्रम, कृषी पतकर्ज, विमा, कृषी निविष्ठा तसेच कृषी विस्तार सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतले ‘सिंधुदुर्गचा राजा’चे मनोभावे दर्शन!

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने कुडाळ येथे साकारलेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची विधिवत पूजा करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुख-समृद्धी आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.    …

error: Content is protected !!