Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळ येथे विभागस्तरीय शालेय कॅरम स्पर्धा उत्साहात!

कुडाळ : प्रतिनिधी    क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तसेच कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कुडाळ यांच्या संयुक्त आयोजनाखाली विभागस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच कुडाळ येथे करण्यात आले.या स्पर्धेचे उद्घाटन…

डिगस – हुमरमळा सीमेवर बिबट्याचा वावर वाढला!

ग्रामस्थांत भीतीचे वातावरणकुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील डिगस व हुमरमळा गावांच्या सीमेवरील परिसरात वन्यप्राणी बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. हुमरमळा ते डिगस खांदीचेगाळू रस्त्यालगत मोटरसायकलस्वाराला बिबट्याचे थेट दर्शन झाले. लोकवस्ती लगत बिबट्याचा वावर वाढल्याने या परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…

वैभववाडी महाविद्यालयात ॲडव्हान्स एक्सेल व ओरिजन लॅब वर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

वैभववाडी प्रतिनिधीयेथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागामार्फत पीएम उषा अंतर्गत ॲडव्हान्स एक्सेल आणि OriginLab या विषयावर दोन दिवसीय हॅण्ड्स-ऑन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.      या कार्यक्रमाचा उद्देश विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक…

वैभववाडी महाविद्यालयाचे जिल्हा परिषद शाळा नावळे येथे सात दिवसीय निवासी शिबीर

वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत नावळे या गावात सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर १६ डिसेंबर ते २२…

दोडामार्गात वाळू अभावी घरकुलांची कामे थांबली

दोडामार्ग : प्रतिनिधी   दोडामार्ग तालुक्यात मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकामाला आवश्यक तेवढी वाळू उपलब्ध नसल्याने अनेक लाभार्थ्यांचे काम ठप्प झाले आहे. पंचायत समितीकडून घरकुल लाभार्थ्यांवर बांधकाम सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा होत असला तरी वाळूअभावी प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे…

सिंधुदुर्गात खाजगी डॉक्टरांकडून दवाखाने बंद ठेवत घटनेचा निषेध

कणकवलीतील हाॅस्पीटल तोडफोड प्रकरणी बंदकणकवली : प्रतिनिधी कासार्डे येथील कस्तुरी पाताडे या युवतीच्या मृत्यू नंतर वस्तुस्थिती समजून न घेता काही समाज विघातक वृत्तींनी कायदा हातात घेत कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटल वर हल्ला करत हॉस्पिटलची तोडफोड केली तसेच नागवेकर कुटुंबीयांतील…

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासोबत झालेली भेट राजकीय नाही – राजन तेली

आ. निलेश राणे यांच्या ट्विट संदर्भात चर्चा करणार : महायुतीचे नेते म्हणून मांडलेली भूमिका योग्यचकणकवली : प्रतिनिधी    कणकवली येथील माझ्या निवासस्थानी ठाकरे शिवसेनेचे माजी आ. वैभव नाईक हे वैयक्तिक भेटीसाठी आले होते. कोकणात आलेल्या माणसाचे आदरातिथ्य करणे ही आपली…

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आदिशक्ती अभियानात उत्साहाने सहभागी व्हावे!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन आदिशक्ती अभियानाचा आढावा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आदिशक्ती अभियानात उत्साहाने सहभागी व्हावे. ग्रामपंचायतींनी केलेल्या स्वगुणांकनाची तालुकास्तरीय आदिशक्ती समितीमार्फत प्रत्यक्ष तपासणी करून, तालुक्यात उत्कृष्टपणे आदिशक्ती अभियान राबविणाऱ्या तीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे…

अनगरसिद्ध संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा… बी.एम.एस. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा शुभारंभ..

वैभववाडी : प्रतिनिधीवैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी या ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक भर घालत अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ, सांगुळवाडी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून बी.एम.एस. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि १०० खाटांचे श्री. राजन पाटील…

ई- पीक पाहणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांना आवाहन

• ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे १७ ते २४ डिसेंबर पर्यंत पिकांची नोंद करावी • ग्रामस्तरीय समिती संयुक्तपणे करणार स्थळ पाहणी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी राज्यात खरीप हंगाम, २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करणेबाबत…

error: Content is protected !!