ठळक घडामोडी

खा. नारायण राणे यांचा कणकवलीत वाढदिवस सोहळा!

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राहणार उपस्थित

वैभववाडी : प्रतिनिधी
      माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक कार्याचा उहापोह होणार  आहे. कोकणच्या विकासासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाचा गौरव यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार आहे.
या सोहळ्यासाठी राज्यभरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. खा. नारायण राणे अमृतमहोत्सवी समितीकडून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

error: Content is protected !!