Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

मुंबई–गोवा महामार्गावर ओरोस येथे अपघात

खासगी आराम बस–कार यांच्यात अपघात दोघे किरकोळ जखमी; कारचा चेंदामेंदा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     मुंबई–गोवा महामार्गावर ओरोस येथील श्री रवळनाथ मंदिरासमोर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी आराम बस आणि कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघे प्रवासी किरकोळ जखमी झाले…

दोडामार्गमध्ये वाढत्या चोऱ्यांविरोधात व्यापारी आक्रमक!

पोलिस निरीक्षकांची घेतली भेट गस्त वाढवा, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करा; अन्यथा आंदोलन दोडामार्ग : प्रतिनिधी    दोडामार्ग शहरासह तालुक्यात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग व्यापारी संघटनेने गुरूवारी पोलीस निरीक्षकांना निवेदन देत पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले. तात्काळ कठोर कार्यवाही, नियमित रात्रीची गस्त…

दोडामार्गमध्ये चोरीचा प्रयत्न; व्यापारी व नागरिक संतप्त

बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत नागरिकांची नाराजी तातडीने सीसीटीव्ही सुरू न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा दोडामार्ग : प्रतिनिधी       दोडामार्ग येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यकांत परमेकर यांचे दुकान बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. दुकानाचे पत्र्याचे शटर मोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र शटर…

माड्याचीवाडी येथे कार-रिक्षात अपघात

कारच्या धडकेने रिक्षा झाली पलटी कुडाळ : प्रतिनिधी       पिंगुळी – पाट मार्गावरील माड्याचीवाडी चेकपोस्ट जवळ चार चाकी कार आणि रिक्षा यांच्यात अपघात झाला. समोरून अंतर्गत रस्त्याने आलेल्या कारची पाटच्या दिशेने जाणा-या रिक्षाला जोरदार धडक बसली. यात रिक्षा रस्त्यावर पलटी झाली.…

पिंगुळीत महिलेचे मंगळसूत्र खेचणा-या परजिल्ह्यातील दोघांना ग्रामस्थांनी पकडले!

संतप्त ग्रामस्थांकडून यथेच्छ चोप कुडाळ पोलीसांची घटनास्थळी धाव :  वेगाने तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन करणा-या परजिल्ह्यातील दोघांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडले. त्यानंतर त्यांना चांगलाच प्रसाद देत कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले…

ग्राहकांना हक्क आणि कर्तव्याची जाणीव असावी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरीत प्रशासनाकडून राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन ग्राहक जनजागृतीपर व्याख्यान, पथनाट्य सादरीकरण सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     ग्राहक हा बाजारपेठेचा केंद्रबिंदू असून त्याचे हक्क सुरक्षित महत्वाचे आहे. बदलत्या काळात ऑनलाईन व्यवहार, डिजिटल पेमेंट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. अशा…

विद्यार्थ्यांच्या सायबर सुरक्षेबाबत पालकांनी सतर्क राहावे – पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम

वालावल हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आदर्श विद्यार्थी म्हणून अथर्व ठाकूरचा गौरव कुडाळ : प्रतिनिधी     आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असून, पालकांनी आपल्या पाल्याच्या संगतीकडे व मित्रपरिवाराकडे विशेष लक्ष द्यावे. सायबर सुरक्षेबाबत सर्वांनीच जागृत राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कुडाळ…

आ.निलेश राणेंनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट!

कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ – मालवणचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी आज (गुरूवारी) सकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांची मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीत महायुती न झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि…

आवळेगाव येथे PMFME अंतर्गत विशेष कृषी मार्गदर्शन मोहिम!

शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ९५ वर्षीय शेतकरी महिलेचा विशेष गौरव कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME) अंतर्गत विशेष जनजागृती व मार्गदर्शन मोहिम नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.    या…

कुडाळ येथे 28 डिसेंबर रोजी चित्रकला मार्गदर्शन कार्यशाळा!

डॉ.प्रमोद वालावलकर स्मृती प्रित्यर्थ आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे होणार बक्षिस वितरण प्रख्यात चित्रकार, शिल्पकार नामानंद मोडक यांची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील होतकरू उदयोन्मुख विद्यार्थ्यांसाठी कुडाळ येथील श्री देवी केळबाई मंदिरात रविवार दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता…

error: Content is protected !!