ठळक घडामोडी

दोडामार्गमध्ये वाढत्या चोऱ्यांविरोधात व्यापारी आक्रमक!

पोलिस निरीक्षकांची घेतली भेट

गस्त वाढवा, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करा; अन्यथा आंदोलन

दोडामार्ग : प्रतिनिधी
    दोडामार्ग शहरासह तालुक्यात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग व्यापारी संघटनेने गुरूवारी पोलीस निरीक्षकांना निवेदन देत पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले. तात्काळ कठोर कार्यवाही, नियमित रात्रीची गस्त व सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
     यावेळी संघटनेचे अध्यक्ष सागर शिरसाट, संतोष नानचे, वैभव इनामदार, सुदेश मळीक, राजेश सावंत, श्याम चांदेलकर, बंटी मोरजकर, अनिल सांबारी, ओंकार पेडणेकर, भूषण सावंत, फोंडू हडीकर, बाळू गावडे, श्री. मयेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे.

error: Content is protected !!