कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ – मालवणचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी आज (गुरूवारी) सकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांची मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीत महायुती न झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपा दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूका लढविल्या होत्या. मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आज आमदार निलेश राणे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली.







