खासगी आराम बस–कार यांच्यात अपघात
दोघे किरकोळ जखमी; कारचा चेंदामेंदा
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
मुंबई–गोवा महामार्गावर ओरोस येथील श्री रवळनाथ मंदिरासमोर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी आराम बस आणि कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघे प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने सर्व प्रवाशी बचावले मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. हा अपघात गुरूवारी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास झाला.
उपलब्ध माहितीनुसार, मुंबईहून गोव्याकडे जाणारी खासगी आराम बस प्रवासी उतरवण्यासाठी थांबली असताना भरधाव वेगात आलेली कार बसला मागाहून जोरदार धडकली. कारचा दर्शनी भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघाताची गंभीरता पाहता कारमधील दोघांना दुखापत झाली असून जखमींवर तेथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघाताची नोंद सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.









