शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
९५ वर्षीय शेतकरी महिलेचा विशेष गौरव
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME) अंतर्गत विशेष जनजागृती व मार्गदर्शन मोहिम नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या वेळी DRP श्रीम. स्नेहा सामंत यांनी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अंतर्गत मिळणाऱ्या लाभांविषयी, अर्ज प्रक्रिया, अनुदान व उद्योग उभारणीच्या संधी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर जीवन राणे यांनी फळपीक विमा योजनेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उप कृषी अधिकारी श्रीम. वाडेकर, सहाय्यक कृषी अधिकारी पूनम कोलते व निखिल ढोकणे यांनी महाविस्तार एआय (AI) अॅप विषयी माहिती दिली. तसेच मंडळ कृषी अधिकारी सगरे यांनी रब्बी पिकांबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगले यांनी विविध कृषी योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते ९५ वर्षीय आदर्श शेतकरी महिला श्रीम. पार्वती कदम यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेला सत्कार. त्यांच्या कार्याचा गौरव उपस्थितांनी केला. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी प्रिया खरवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपसरपंच विवेक कुपेरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण
या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना कृषी व प्रक्रिया उद्योगाशी संबंधित विविध योजनांची उपयुक्त माहिती मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.







