ढोल-ताशांचा गजर अन् फटाक्यांची आतषबाजी; सिंधुदुर्गात पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन!

सिंधुदुर्ग : ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…’च्या जयघोषाने, ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच दिवसांच्या गणरायाला शुक्रवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांत घरगुती गणेशमूर्तींचे समुद्र, नदी, तलाव, ओहोळ तसेच विविध विसर्जनस्थळी भक्तिमय…








