

कुडाळ : प्रतिनिधी
राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांनी आज शुक्रवारी कुडाळ येथे विराजमान झालेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने मंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, विनायक राणे, दीपक नारकर, रूपेश कानडे, अभिषेक गावडे, रोहित भोगटे, चेतन पडते, नागेश नेमळेकर, राकेश नेमळेकर, संदेश नाईक, प्रसन्ना गंगावणे यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य, पदाधिकारी व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘सिंधुदुर्गचा राजा’च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून, विविध मान्यवरांकडूनही गणरायाचे दर्शन घेतले जात आहे









