Category कुडाळ

सेवा संकल्प अभियानांतर्गत कुडाळ न.पं.मार्फत अभिनव नगर येथे स्वच्छता मोहीम!

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या उपस्थितीत मोहीम कुडाळ : ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने अभिनव नगर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून रस्त्यालगतची अस्वच्छता दूर करण्यात आली आहे. केवळ झाडे-झुडपे काढण्यावरच न थांबता, जेसीबीच्या साहाय्याने परिसरातील कचरा साफ करण्यात आला आहे.     …

वाढीव वीज बिलांविरोधात कवठी ग्रामस्थ आक्रमक!

जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणवर धडक कुडाळ येथे अधिक्षक अभियंता यांची भेट घेत मांडल्या समस्या कुडाळ : कवठी ग्रामस्थांनी वाढीव वीज बिलासंदर्भात जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री.राख यांची आज भेट घेऊन समस्या मांडल्या.      यावेळी जि.प.सदस्य…

कुडाळच्या जुन्या कोर्टाच्या जागी छत्रपती संभाजी महाराजांचे संग्रहालय उभारण्याची मागणी!

कुडाळ सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टचे निवासी उपजिल्हाधिका-यांना निवेदन कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथील सध्या अस्तित्वात असलेले कोर्ट स्थलांतरित झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनचरित्राचे दर्शन घडविणारे संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी कुडाळ सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने…

कुडाळ शहर शिवसेनेच्या उपक्रमाचे आमदार निलेश राणे यांच्याकडून कौतुक!

गणेश सजावट स्पर्धेतील ५१ विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमुळे शहरांमधील संघटना मजबूत होत आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी गणेश सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी केले. यावेळी शहर मर्यादित शिवसेनेच्या वतीने…

कुडाळात ‘सिंधुदुर्गचा राजा’ची मोठ्या दिमाखात विसर्जन मिरवणूक!

कुडाळ : सिंधुदुर्गच्या राजाची विसर्जन मिरवणूक थाटातकुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक नजीकच्या पटांगणात सतरा दिवस विराजमान झालेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला आज बुधवारी सायंकाळी उत्साहात सुरुवात झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि बॅण्डच्या गजरात मिरवणूक…

कारिवणे व आवळेगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडून भातशेतीची पाहणी!

‘डीसीएस’ पीक पाहणी; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद कुडाळ : तालुक्यातील कारिवणे आणि आवळेगाव येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी आज प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष शेतावर जाऊन ‘डीसीएस’ (डिजिटल क्रॉप सर्व्हे) पीक पाहणी केली. तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवींनी घेतले ‘सिंधुदुर्गचा राजाचे’ दर्शन!

बँकेच्या प्रगतीसह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केली प्रार्थना कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज कुडाळ येथे ‘सिंधुदुर्गचा राजा’चे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बँकेच्या प्रगतीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.      ‘सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान’च्या वतीने विनायक…

कौशल्य आत्मसात करून रोजगाराच्या संधी निर्माण करा; आ.निलेश राणेंचे युवकांना आवाहन!

कुडाळ महाविद्यालयात ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ उत्साहात १५५ उमेदवारांची उपस्थिती; ९७ उमेदवारांची प्राथमिक तर १९ उमेदवारांची अंतिम निवड कुडाळ : रोजगार मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना आमदार निलेश राणे. सोबत उपस्थित प्रभाकर सावंत, प्राचार्य स्मिता सुरवसे, अरविंद शिरसाट, दीपलक्ष्मी पडते व मान्यवर.कुडाळ :…

सिंधुदुर्गच्या खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी सुविधा उभारू : आ.निलेश राणे

कबड्डीपटूंना सुविधा देण्यासाठी लवकरच बैठक; आमदार निलेश राणेंचे आश्वासन कुडाळला जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी कुडाळ : प्रतिनिधी      माझ्या जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर खेळताना पाहायचे आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा या ठिकाणी निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे त्यामुळे…

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश; जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ जलतारा उभारणी उद्दिष्टपूर्तीसाठी घेतला आढावा सिंधुदुर्ग : जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि आगामी काळातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जलपुनर्भरण, पाणीसाठा निर्मिती आणि पाणी बचतीच्या उपाययोजनांना गती…

error: Content is protected !!