

जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणवर धडक
कुडाळ येथे अधिक्षक अभियंता यांची भेट घेत मांडल्या समस्या
कुडाळ : कवठी ग्रामस्थांनी वाढीव वीज बिलासंदर्भात जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री.राख यांची आज भेट घेऊन समस्या मांडल्या.
यावेळी जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांच्यासह ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत स्मार्ट मीटर व वाढीव वीज बिला संदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारी मांडून सविस्तर चर्चा करण्यात आली. जनतेच्या हितासाठी आम्ही कायम लढणार असल्याचे रुपेश पावसकर यांनी सांगितले आणि ग्रामस्थांच्या शंकेचे निरसन झाल्याशिवाय स्मार्ट वीज मीटर बसवू नयेत अशी मागणी करण्यात आली. अधिक्षक अभियंता यांनी सकारात्मक आश्वासन देत संबंधित कर्मचारी यांना तशा सूचना दिल्या.
यावेळी मंगेश बांदेकर, रुपेश वाडयेकर, राजन खोबरेकर, नंदकिशोर वाडयेकर, सुहास खोबरेकर, गोकुळ तोरस्कर आदी कवठी ग्रामस्थ उपस्थित होते.









