ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवींनी घेतले ‘सिंधुदुर्गचा राजाचे’ दर्शन!

बँकेच्या प्रगतीसह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केली प्रार्थना

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज कुडाळ येथे ‘सिंधुदुर्गचा राजा’चे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बँकेच्या प्रगतीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.
      ‘सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान’च्या वतीने विनायक राणे यांनी मनीष दळवी यांचे स्वागत केले. यावेळी बँकेचे संचालक विद्याप्रसाद बांदेकर, समीर सावंत, निता राणे, आत्माराम ओटवणेकर, रवींद्र मडगांवकर, प्रकाश मोर्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच आनंद शिरवलकर, स्वरूप वाळके, सुनील बांदेकर, नागेश नेमळेकर, राकेश नेमळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!