ठळक घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत कुडाळ न.पं.मार्फत अभिनव नगर येथे स्वच्छता मोहीम!

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या उपस्थितीत मोहीम

कुडाळ : ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने अभिनव नगर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून रस्त्यालगतची अस्वच्छता दूर करण्यात आली आहे. केवळ झाडे-झुडपे काढण्यावरच न थांबता, जेसीबीच्या साहाय्याने परिसरातील कचरा साफ करण्यात आला आहे.
      शहरातील अभिनव नगर येथील रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर झाडी-वेली वाढल्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली होती. तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची दखल घेत कुडाळ नगरपंचायतीने तातडीने मोहीम हाती घेतली. या मोहिमेत नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यालगतची सर्व झाडी व कचरा साफ केला. याचसोबत जेसीबी यंत्राचा वापर करून रस्त्यालगत असलेला कचरा उचलून साफ करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाताना दिसणारी अस्वच्छ व विद्रूप परिस्थिती दूर झाली आहे.
     या स्वच्छता मोहीम प्रसंगी कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर यांच्यासह न.पं. चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नगरपंचायतीच्या या तत्पर कामगिरीबद्दल स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्षा, नगरसेवक व न.पं. प्रशासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!