

कुडाळ : सिंधुदुर्गच्या राजाची विसर्जन मिरवणूक थाटात
कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक नजीकच्या पटांगणात सतरा दिवस विराजमान झालेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला आज बुधवारी सायंकाळी उत्साहात सुरुवात झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि बॅण्डच्या गजरात मिरवणूक कुडाळ शहरातून पावशी तलावाच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी शहरात श्रींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. आमदार निलेश राणे यांच्यासह सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. सायंकाळी उशिरा पावशी येथील तलावात ‘सिंधुदुर्गचा राजा’चे थाटात विसर्जन करण्यात येणार आहे









