Category बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत कुडाळ न.पं.मार्फत अभिनव नगर येथे स्वच्छता मोहीम!

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या उपस्थितीत मोहीम कुडाळ : ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने अभिनव नगर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून रस्त्यालगतची अस्वच्छता दूर करण्यात आली आहे. केवळ झाडे-झुडपे काढण्यावरच न थांबता, जेसीबीच्या साहाय्याने परिसरातील कचरा साफ करण्यात आला आहे.     …

वाढीव वीज बिलांविरोधात कवठी ग्रामस्थ आक्रमक!

जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणवर धडक कुडाळ येथे अधिक्षक अभियंता यांची भेट घेत मांडल्या समस्या कुडाळ : कवठी ग्रामस्थांनी वाढीव वीज बिलासंदर्भात जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री.राख यांची आज भेट घेऊन समस्या मांडल्या.      यावेळी जि.प.सदस्य…

कुडाळच्या जुन्या कोर्टाच्या जागी छत्रपती संभाजी महाराजांचे संग्रहालय उभारण्याची मागणी!

कुडाळ सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टचे निवासी उपजिल्हाधिका-यांना निवेदन कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथील सध्या अस्तित्वात असलेले कोर्ट स्थलांतरित झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनचरित्राचे दर्शन घडविणारे संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी कुडाळ सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने…

कुडाळ शहर शिवसेनेच्या उपक्रमाचे आमदार निलेश राणे यांच्याकडून कौतुक!

गणेश सजावट स्पर्धेतील ५१ विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमुळे शहरांमधील संघटना मजबूत होत आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी गणेश सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी केले. यावेळी शहर मर्यादित शिवसेनेच्या वतीने…

वनराई बंधाऱ्यांप्रमाणे जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कधी निश्चित करणार?

शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल सिंधुदुर्ग : पावसाअभावी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीसाठी  लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री नितेश राणे यांनी निश्चित केले असून त्याचे नियोजन आणि आढावा जिल्हाधिकारी घेत आहेत. त्याबद्दल दुमत…

कुडाळात ‘सिंधुदुर्गचा राजा’ची मोठ्या दिमाखात विसर्जन मिरवणूक!

कुडाळ : सिंधुदुर्गच्या राजाची विसर्जन मिरवणूक थाटातकुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक नजीकच्या पटांगणात सतरा दिवस विराजमान झालेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला आज बुधवारी सायंकाळी उत्साहात सुरुवात झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि बॅण्डच्या गजरात मिरवणूक…

मालवण कुंभारमाठ येथे २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान विभागीय टेबल टेनिस स्पर्धा!

कोकण-पश्चिम महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील २१५ खेळाडूंचा सहभाग मालवण : महेश कदम        महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली दि. २ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोकण-पश्चिम महाराष्ट्र विभागीय टेबल टेनिस स्पर्धेचे…

दुष्काळसदृश परिस्थितीत प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर; सावंतवाडी तालुक्यात जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत-सीईओ अपूर्वा बासुर यांचा दौरा!

विकासकामांचा ‘ऑन द स्पॉट’ आढावा; जलसंधारणापासून शिक्षणापर्यंत पाहणी अध्यक्ष-सीईओंच्या दौऱ्यात कामांना गती देण्याच्या सूचना सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासोबतच दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण व पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा…

सीसीटीव्हीने दिला सुराग, पोलिसांनी गाठले जालना; सावंतवाडी बसस्थानकातील सोन्याच्या दागिने चोरीचा छडा!

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलिसांची संयुक्त धडक कारवाई; संशयित महिला जालना जिल्ह्यातून ताब्यात सिंधुदुर्ग : सावंतवाडी बसस्थानक येथे १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई…

दुष्काळ निवारण उपसमितीत मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंचा देखील समावेश!

मंत्रिमंडळ उपसमितीत याआधी १० मंत्री आणि मुख्य सचिव यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश होता आता एकूण ११ मंत्री आणि मुख्य सचिव अशी उपसमिती असणार आहे मुंबई : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन उपाययोजना सुचविणे आणि परिस्थितीचे…

error: Content is protected !!