वेताळबांबर्डे जि.प. मतदार संघातून नागेश आईर यांनी भरला उमेदवारी अर्ज

शिंदे शिवसेनेतून अधिकृत उमेदवारी जाहीर कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे जि.प. मतदार संघातून शिंदे शिवसेनेतर्फे नागेश आईर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना कालच शिंदे शिवसेनेतर्फे उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते.







