विनायक राऊत, वैभव नाईक, अरुण दुधवडकर यांचा कुडाळ दौरा; इच्छुकांना शुभेच्छा
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या यादीकडे लागले लक्ष
कुडाळ : प्रतिनिधी
होऊ घातलेल्या जि.प. व पं.स. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर व माजी आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ येथे इच्छूक उमेदवारांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ठाकरे शिवसेनेसह मविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. उद्या बुधवारी सकाळपर्यंत अधिकृत उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता असून, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उद्या बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.









