ठळक घडामोडी

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन,सिंधुदुर्गचे पोलिस प्रशासनाला निवेदन

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
      सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा अवैध मटका, जुगार, बेकायदा दारू वाहतूक व विक्री तसेच अमली पदार्थांची विक्री वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या अवैध धंद्यांचा विळखा तरुण पिढीसह लहान मुलांपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात असून, यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हा पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
       या संदर्भात सोमवारी पोलिस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले असून, जिल्ह्यात सुरू असलेले सर्व प्रकारचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना असोसिएशनच्या महिला जिल्हाध्यक्षा मानसी परब, कार्याध्यक्ष मनोज तोरसकर, महिला जिल्हा सचिव संजना सावंत, जिल्हा सचिव विनोद जाधव, दर्शना राणे, सौ. खानोलकर, रेवती वालावलकर, नामदेव जानकर आदी पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती असोसिएशनकडून देण्यात आली.

error: Content is protected !!