आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश
माणगाव मधून रूपेश कानडे यांना जि.प. तर कौशल जोशी यांना पं.स.साठी उमेदवारी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ भाजपचे सरचिटणीस रूपेश कानडे तसेच ठाकरे शिवसेनेचे माणगाव विभाग संघटक कौशल जोशी यांनी आज आमदार निलेश राणे याच्या शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. रूपेश कानडे यांना माणगाव जि.प. मतदार संघात तर कोशल जोशी यांना माणगाव पं.स. मतदार संघात शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दोघांनाही एबी फॉर्मचे वाटप आ.निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









