Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

साळगाव-माणगाव मार्गावरील पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला!

सकाळी साडेसातच्या सुमारास मृतदेह आढळल्याने साळगाव परिसरात खळबळ कुडाळ पोलिसांकडून पंचनामा; मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू कुडाळ : तालुक्यातील साळगाव-मळवाडी ते साळगाव-माणगाव रस्त्यावरील पुलाखाली आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सकाळी ७.३०…

कुडाळच्या पर्यटन विकासासाठी विविध मागण्या; दादा नेवाळकर यांचे आमदार निलेश राणेंना निवेदन!

कुडाळ : प्रतिनिधी       भंगसाळ नदीकाठी साकारण्यात आलेल्या गणेश घाटाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त कुडाळ शहराच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विविध विकासकामे हाती घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादा नेवाळकर यांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.       गणेश घाटाचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. अपूर्वा बासूर रुजू!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून स्वागत सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी सोमवारी पदभार स्वीकारला आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांनी प्रशासकीय कामकाजाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती…

सिंधुदुर्गातील मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा; मंदार शिरसाट यांचे सिनेट सदस्यांना निवेदन!

निकाल, गुणपत्रिका अन् पुनर्मूल्यांकनाच्या विलंबाचा घोळ थांबवा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मंदार शिरसाट यांनी वेधले लक्ष सिंधुदुर्ग उपकेंद्रातील सर्व सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शैक्षणिक व प्रशासकीय समस्यांवर…

तेंडोली तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सत्यवान तेंडोलकर यांची बिनविरोध निवड!

कुडाळ : तेंडोली गावातील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा यसार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान तेंडोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. १० ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.      गावातील वाद-विवाद सामोपचाराने व संवादातून मिटवून नागरिकांचे…

शिक्षक दिनी स्वप्नील खांबल यांना ‘द नेशन बिल्डर अवॉर्ड’!

कुडाळ : शिक्षक दिनाचे औचित्य साधून आंब्रड मधील श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक स्वप्नील देवदत्त खांबल यांना रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलतर्फे देण्यात येणारा ‘द नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६-२७’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल, कसाल येथे झालेल्या…

सिंधुदुर्गात सुरु होणार आधुनिक फेरीबोट सेवा!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा स्थानिक जहाजबांधणी, सागरी अभियांत्रिकी, पर्यटन आणि रोजगारालाही चालना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर्देशीय जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाचा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश…

मंत्री नितेश राणे यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवारांची ‘सिल्वर ओक’वर भेट!

ससून डॉकच्या आधुनिकीकरणासह मच्छीमारांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची दिली माहिती मत्स्य व बंदरे विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची दिली माहिती मुंबई : मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांची आज…

कुडाळच्या विकासासाठी मोठा संकल्प; जागतिक दर्जाचे शहर बनविणार : आ. निलेश राणे!

बहुचर्चित गणेश घाट व परिसर सुशोभिकरण कामाचे दिमाखात लोकार्पण कुडाळ : “तुम्ही मला जिंकवलंय, आता माझा मतदारसंघ मला जिंकवायचाय. महाराष्ट्राच्या नकाशावर कुडाळ-मालवण मतदारसंघ मागे राहू नये, ही तळमळ माझ्यामध्ये आहे. मागील दहा वर्षांत जे घडलं नाही, ते घडवण्याचा आपण प्रयत्न…

निवतीतील जलसफरीवर बंदी; पर्यटन व्यवसाय धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव – वैभव नाईक!

देवबाग, तारकर्ली, वेंगुर्ला निवती आणि मालवणच्या स्थानिक पर्यटन व्यवसायिकांवर अन्याय केल्यास शिवसेना (उबाठा) पक्ष तीव्र आंदोलन छेडेल जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा इशारा सिंधुदुर्ग : निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना जलसफर घडविणाऱ्या नौकांना महाराष्ट्र सागरी मंडळाने आय.व्ही. ॲक्टअंतर्गत प्रवासी वाहतुकीस बंदी…

error: Content is protected !!