ठळक घडामोडी

तेंडोली तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सत्यवान तेंडोलकर यांची बिनविरोध निवड!

कुडाळ : तेंडोली गावातील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा यसार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान तेंडोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. १० ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.
      गावातील वाद-विवाद सामोपचाराने व संवादातून मिटवून नागरिकांचे न्यायालयीन प्रक्रियेत होणारे आर्थिक नुकसान व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची भूमिका महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर तेंडोलकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
      सत्यवान तेंडोलकर हे संविधानिक हितकारणी महासंघ (सिंधुदुर्ग)चे उपाध्यक्ष असून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या निवडीचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.
      यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्षा तथा सरपंच अनघा तेंडोलकर, पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, ग्रामविकास अधिकारी सुनीता कदम, उपसरपंच आकाश मुणनकर, सामाजिक कार्यकर्ते विजय प्रभू, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, शासकीय कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!