

कुडाळ : शिक्षक दिनाचे औचित्य साधून आंब्रड मधील श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक स्वप्नील देवदत्त खांबल यांना रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलतर्फे देण्यात येणारा ‘द नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६-२७’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल, कसाल येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला.
उपक्रमशील व गुणवंत शिक्षक म्हणून खांबल यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली, असिस्टंट गव्हर्नर संजय रावराणे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी डॉ. विद्याधर तायशेटे, प्रेसिडेंट डॉ. प्रशांत कोलते, झोनल को-ऑर्डिनेटर शशिकांत चव्हाण, अध्यक्ष दीपक आळवे, रोटरियन सत्यवान चव्हाण, ललित वंजारे, वर्षा बांदेकर, नितीन बांदेकर, मोरजकर तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि कसाल शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
खांबल यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय तसेच संस्थेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.









