गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज!

कुडाळातील रस्ते दुरुस्तीला वेग; सा.बां.ची माहीती कुडाळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. मंगळवारी कनिष्ठ अभियंता ईश्वर बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांतील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. …








