ठळक घडामोडी

आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धा!

शिवसेना-नगराध्यक्ष-नगरसेवकांचे आयोजन; मोठ्या बक्षिसांची स्पर्धा

१० सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करण्याचे गटनेता विलास कुडाळकर यांचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
      आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेना नगराध्यक्ष व नगरसेवक, नगरसेविका आयोजित कुडाळ शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून १० सप्टेंबर पर्यंत स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन न.पं.तील गटनेता विलास कुडाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
       गेल्या वर्षी प्रमाणे गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली आहे ही स्पर्धा कुडाळ शहर मर्यादित असून शहरातून प्रथम तीन क्रमांकासाठी बक्षिसे याप्रमाणे प्रथम क्रमांक:- १५ हजार रुपये व चषक, प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक:- १० हजार रुपये व चषक, प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक:- ५ हजार रुपये व चषक, प्रमाणपत्र तसेच प्रभाग निहाय स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकास बक्षिसे याप्रमाणे प्रथम क्रमांक:- ३ हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक:- २ हजार रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक:- १ हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व वृक्ष भेट देण्यात येणार आहे.
      स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १० सप्टेंबर २०२६ पर्यंत आपली नाव नोंदणी युवासेना शहरप्रमुख आबा धडाम (७२१८०१६८६८) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले सून गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ सप्टेंबर २०२६ पासून परीक्षण सुरू केले जाणार आहे. असे प्रसिद्धी पत्रकात गटनेता विलास कुडाळकर यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!