ठळक घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज!

कुडाळातील रस्ते दुरुस्तीला वेग; सा.बां.ची माहीती

कुडाळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. मंगळवारी कनिष्ठ अभियंता ईश्वर बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांतील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते.
     कुडाळ-कविलकाटे रस्ता, उदयमनगर – एस.एन.देसाई चौक परिसर तसेच रेल्वेस्टेशन रोडवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेस्टेशन रोडवरील खड्डे सिमेंट काँक्रीटच्या सहाय्याने बुजविण्यात येत आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यालगतची झाडी छाटणीची कामेही सुरू करण्यात आली आहेत.
      गणेशोत्सव काळात शहरातील रस्त्यांवर नागरिक व गणेशभक्तांची वाढणारी वर्दळ लक्षात घेऊन रस्ते सुरक्षित व वाहतुकीसाठी सुकर करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियोजनबद्ध पद्धतीने कामे करण्यात येत आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ईश्वर बामणे यांनी दिली.

error: Content is protected !!