
कुडाळ : हुमरमळा (अणाव) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संजय दत्ताराम पालव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या या ग्रामसभेला ११४ ग्रामस्थांची उपस्थिती होती.
यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीची पुनर्गठना करण्यात आली. अध्यक्षपदासाठी संजय दत्ताराम पालव यांच्या नावाची सूचना बाबुराव तानाजी राणे यांनी केली, तर जयभारत प्रतापराव पालव यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षपदासाठी अन्य कोणाचेही नाव पुढे न आल्याने संजय पालव यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. या निवडीनंतर संजय पालव यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सरपंच, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.










