Category सिंधुदुर्ग

गुन्ह्यांना घाबरणार नाही, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहणार!

ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी    राज्यातील स्पर्धा परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ कुडाळ गांधी चौकात झालेल्या आंदोलनानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर युवासेना (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी…

भुईबावडा घाटात दरड कोसळून माती रस्त्यावर; वाहतूक विस्कळीत!

प्रशासनाची घटनास्थळी धाव ; दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू साळगाव, असलदेत घरावर झाड पडून नुकसान; विजेचा लपंडाव सुरू सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारीही धुवाॅधार पावसाचा जोर कायम आहे. अतिवृष्टीत ठिकठिकाणी झाडे पडून तसेच पडझडीच्या घटना घडून मोठे नुकसान झाले…

पालकमंत्री नितेश राणे रविवारी ५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती कणकवली : प्रतिनिधी    राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवारी ५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

पर्यटन विकास, महसुली वसुली व लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला गती द्या!

विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचे प्रशासनाला निर्देश ‘शाळा तेथे दाखले’ उपक्रमाचे विशेष कौतुक; ‘एआय’ तंत्रज्ञानाचा सर्वांनी उपयोग करावा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       जिल्ह्यात महसुली वसुली वाढविण्यासाठी नियोजनबद्ध व प्रभावी प्रयत्न करावेत. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने होईल,…

रानबांबुळीत विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांची महसूल कार्यालयाला भेट!

प्रलंबित महसुली प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश अंगणवाडीत चिमुकल्यांशी संवाद; शिक्षण, पोषण सुविधांची केली पाहणी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज शनिवारी कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाला भेट देत महसूल कामकाजाचा सविस्तर…

ओरोसजवळ एलसीबीची मोठी कारवाई; गोवा बनावटी दारूसह 1.50 कोटींचा मुद्देमाल जप्त!

गोव्याहून मुंबईच्या दिशेने होत असलेल्या अवैध मद्य वाहतुकीचा पर्दाफाश चौवीस तासातील एलसीबीची दुसरी मोठी कारवाई सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत गोव्याहून मुंबईच्या दिशेने अवैधरित्या नेण्यात येणा-या गोवा बनावटी दारूसह सुमारे…

पावशीत मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कारला अपघात!

चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात कुडाळ : प्रतिनिधी     मुंबई गोवा महामार्गावर पावशी घावनळे फाटा येथील सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणा-या भरधाव कारला अपघात झाला. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची लेन निसरडी बनल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर चढली. त्यानंतर विरूद्ध बाजूने दुस-या…

तेंडोली येथे आज संयुक्त दशावतारी नाट्य प्रयोग!

जिल्ह्यातील नामवंत कलाकारांचा सहभाग कुडाळ : प्रतिनिधी     तेंडोली-वरची आदोसवाडी येथे रामचंद्र राऊळ मित्रमंडळाच्यावतीने 4 जुलै रोजी रात्री 7.30 वाजता तेथीलच कुलस्वामिनी मंदिरात “शिव अजमीढ संग्राम अथार्त अजमीढ शरसेतू” हे संयुक्त दशावतार नाटक आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नावाजलेल्या कलाकारांचा या…

ओरोस येथे मुंबई-गोवा महामार्गावर एलसीबीची मोठी कारवाई!

२१.६३ लाखांच्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांसह ३०.१३ लाखाचा मुद्देमाल जप्त तिघांविरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; एलसीबीची धडक कारवाई सिंधुदुर्ग : प्रतिनिधी       स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेला गुटखा व सुगंधी…

अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडा – वैभव नाईक!

देवगड येथील अणुऊर्जा प्रकल्पाला आंबा-काजू बागायतदार शेतकऱ्यांचा ताकदीने विरोध देवगड : प्रतिनिधी         आंबा काजू बागायतदार, देवगड व्यापारी संघ आणि अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवारी अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आणि आंबा बागायतदारांच्या न्याय मागण्यासाठी भव्य मेळावा व…

error: Content is protected !!