Category सिंधुदुर्ग

उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे जागतिक नारळ दिन मोठ्या उत्साहात साजरा!

कुडाळ : उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे येथे नुकताच जागतिक नारळ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी, सहाय्यक कुलसचिव श्री. विलास यादव आणि प्रमुख अतिथी श्री. अनिल सर्वेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या…

कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध विषयांवर चर्चा!

महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल विभागाच्या कारभारावर सदस्यांचा संताप कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध प्रश्नांवर सदस्यांनी जोरदार चर्चा घडवून आणली. महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल विभागाच्या कारभारावर सदस्यांनी संताप व्यक्त करीत, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने चांगली सेवा…

जहाजबांधणी उद्योगातून रोजगाराची क्रांती शक्य!

गोव्या पेक्षा महाराष्ट्रासाठी मोठी संधी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उत्तर गोव्यातील प्रका इंजिनिअरिंग शिपयार्डला भेट   सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील जलवाहतुकीला चालना देण्यासह जहाजबांधणी आणि जहाज दुरुस्ती उद्योगाला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाव निर्माण करण्याच्या दृष्टीने राज्याचे मत्स्य…

पहिल्या वंचित समाजाच्या जनता दरबाराचे यश; समाजाच्या मागणीनुसार १७.१७ कोटींची  विकासकामे मार्गी!

१३.७९ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता; २२ कामे पूर्ण, १०९ कामे प्रगतीपथावर पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती जनता दरबारात वंचित समाजाची ४२९ प्राप्त झाली होती निवेदने  कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वंचित …

गणेशोत्सव काळातील नेटवर्क समस्यांसाठी बीएसएनएलची हेल्पलाईन सुरू!

सिंधुदुर्गातील नागरिकांना नेटवर्क, कव्हरेजसह विविध तक्रारी नोंदविता येणार सिंधुदुर्ग : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएलच्या मोबाईल नेटवर्कमध्ये येणारे अडथळे, कव्हरेजची समस्या तसेच इतर दूरसंचारविषयक अडचणी सोडविण्यासाठी बीएसएनएल सावंतवाडी कार्यालयाकडून विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना आपल्या तक्रारी तसेच नेटवर्कशी…

सुपोषणाची छत्री’ घेऊन कुपोषणावर मात करण्याचा संदेश!

कुंभारमाठ जरीमरी येथे पोषण माहानिमित्त जनजागृती रॅली मालवण : पोषण माह २०२६ अंतर्गत “आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी” या संकल्पनेतून कुंभारमाठ जरीमरी अंगणवाडी केंद्रातर्फे “सुपोषणाची छत्री — कुपोषणावर मात” या अभिनव संकल्पनेद्वारे जनजागृती करण्यात आली.      यावेळी सुपोषणाची छत्री, पोषणयुक्त आहाराचे विविध…

कुडाळच्या महिला व बाल रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ रूजू; आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश!

डॉ. जगताप रुजू; कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांची माहीती प्रसूतीसाठी महिला रुग्णालय सेवेचा लाभ घ्यावा; सभापती मिलिंद नाईक यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात अखेर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्या आहेत. आमदार निलेश राणे…

पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून जिल्ह्यात विकास आणि पर्यावरणाचा समतोल – पालकमंत्री नितेश राणे!

सिंधुदुर्ग २०४७ च्या नियोजनासाठी अभ्यास गटाकडून जिल्ह्याचा अभ्यास सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून विकास आणि पर्यावरणाचा समतोल साधणारा सर्वसमावेशक विकास करण्यात येत आहे, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. ‘स्ट्रॅटेजिक रिजनल प्लॅन फॉर सिंधुदुर्ग…

आठवडा बाजाराच्या गर्दीत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ लंपास!

एस.टी. बसमध्ये चढताना चोरट्याचा डाव बसस्थानकात सीसीटीव्ही नसल्याने तपासाला अडथळा वैभववाडी : प्रतिनिधी   आठवडा बाजाराच्या दिवशी एस.टी. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून पलायन केल्याची घटना बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास वैभववाडी बसस्थानकात…

गणेश चतुर्थी काळात कोणावरही वीज पुरवठा खंडित अथवा वीज बिलाची सक्ती करू नका; कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांचा इशारा

महावितरणकडून सक्ती झाल्यास थेट संपर्क साधा; मंदार शिरसाट यांचे नागरिकांना आवाहन कुडाळ : कोकणचा सर्वात मोठा उत्सव असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. संपूर्ण कुडाळ शहर आणि सिंधुदुर्ग जिल्हा बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना, महावितरण कंपनीकडून वीज बिल…

error: Content is protected !!