

डॉ. जगताप रुजू; कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांची माहीती
प्रसूतीसाठी महिला रुग्णालय सेवेचा लाभ घ्यावा; सभापती मिलिंद नाईक यांचे आवाहन
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात अखेर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्या आहेत. आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे डॉ. जगताप या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून रुग्णालयात रुजू झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील महिला रुग्णांना आता स्त्रीरोग व प्रसूतीसंदर्भातील अधिक चांगली वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे, अशी माहीती सभापती मिलिंद नाईक यांनी दिली.
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार निलेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने महिला रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रुजू झाल्या आहेत. याबद्दल कुडाळचे सभापती मिलिंद नाईक यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, सभापती मिलिंद नाईक यांनी डॉ. जगताप यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी महिला रुग्णालयाच्या सदस्य सौ. रश्मी नाईक, विश्वास पांगुळ, राम बांदेलकर, डॉ. तेलंग, डॉ. संजय वाळके आदी उपस्थित होते.
महिलांनी प्रसूतीसाठी महिला रुग्णालयाचा लाभ घ्यावा – सभापती मिलिंद नाईक
कुडाळ तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी प्रसूतीसाठी कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन सभापती मिलिंद नाईक यांनी केले. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्यामुळे महिलांना प्रसूतीपूर्व तपासणी, प्रसूती तसेच स्त्रीरोगाशी संबंधित उपचारांची सुविधा अधिक सक्षमपणे मिळणार आहे. त्यामुळे महिलांनी या रुग्णालयाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.









