

कुंभारमाठ जरीमरी येथे पोषण माहानिमित्त जनजागृती रॅली
मालवण : पोषण माह २०२६ अंतर्गत “आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी” या संकल्पनेतून कुंभारमाठ जरीमरी अंगणवाडी केंद्रातर्फे “सुपोषणाची छत्री — कुपोषणावर मात” या अभिनव संकल्पनेद्वारे जनजागृती करण्यात आली.
यावेळी सुपोषणाची छत्री, पोषणयुक्त आहाराचे विविध संदेश तसेच ‘कुपोषणाचा राक्षस’ या आकर्षक संकल्पनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना संतुलित व सकस आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले. बालक, माता, किशोरी तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पोषणयुक्त आहार घेऊन निरोगी जीवनशैली अंगीकारावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.
या उपक्रमास बालविकास प्रकल्प अधिकारी उल्का हजारे, सरपंच पूनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, ग्राम सेवक निकम ,आशा स्वयंसेविका प्रणिता भोगावकर, अश्विनी नेवांळे ग्रामपंचायत सदस्य सोनाली डीचवलकर, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका भक्ती मांजरेकर व अंगणवाडी मदतनीस श्रेया भोगावकर यांची उपस्थिती लाभली. अंगणवाडीच्या माध्यमातून पोषणाबाबत जनजागृती करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.









