Category महाराष्ट्र

व्हॉट्सअॅपवरील APK फाईलने ७.९२ लाखांचा ऑनलाईन गंडा; देवगडमध्ये धक्कादायक प्रकार

देवगड : प्रतिनिधी    अनोळखी नंबरवरून व्हाट्सअपवर आलेल्या एपीके फाईलच्या माध्यमातून बँक खात्यातून तब्बल ७ लाख ९२ हजार ५२० रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जामसंडे परिसरातील पीडित व्यक्तीने याबाबत देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात…

बेकायदेशीर एलईडी वापरणाऱ्या मासेमारी बोटींवरील कारवाईसाठी तपासणी मोहिम व्यापक करा!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : प्रतिनिधी      एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींवर कारवाई करण्यासाठी तपासणी मोहिम व्यापक प्रमाणात राबवावी असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.      मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे…

ड्रोनच्या मदतीने सागरी सुरक्षेला बळ, नवीन दहा ड्रोन खरेदी करा!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश नवीन अत्याधुनिक गस्ती नौका खरेदीसाठी तातडीने कार्यवाहीच्या सूचना मुंबई : प्रतिनिधी      अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी तसेच किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक सक्षम व सुरळीत करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण हा उत्तम पर्याय असल्याने या कामासाठी आणखी…

चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा!

सिंधुदुर्गचे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी यासाठी  संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व…

स्मार्ट मीटरला विरोध: वेताळ बांबर्डे ग्रामस्थांचा महावितरणवर एल्गार

“आधी सेवा सुधारा, मग मीटर लावा” – ग्रामस्थांचा ठाम इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात तसेच वीज समस्यांबाबत आक्रमक भूमिका घेत महावितरण प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आधी वीजपुरवठा सेवा सुरळीत आणि…

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार उद्या सिंधुदुर्गात!

मालवण : प्रतिनिधी    संतपरंपरेच्या पावन आशीर्वादाने समाजप्रबोधन, धर्मसंरक्षण आणि हिंदू समाजाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार सिंधुदुर्ग जिल्हा प्रवासावर येत असून, या प्रवासादरम्यान संतसमाजाशी सुसंवाद साधण्यासाठी संत संवाद…

एलईडी मासेमारीचा ‘भस्मासुर’ थोपवा – हरी खोबरेकर!

एलईडी मासेमारीविरोधात १० एप्रिलला मालवणात भव्य मोर्चा पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय; ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा मालवण : प्रतिनिधी     गेल्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सुरू असलेल्या विनाशकारी एलईडी लाईट फिशिंगमुळे पारंपरिक आणि छोटा मच्छीमार उद्ध्वस्त होत आहे. या ‘भस्मासुरा’ला आवर घालण्यात मत्स्य…

कुडाळमधील एमआयडीसीच्या रस्त्यावर दिशादर्शक व वेगमर्यादा फलक लावण्याची मागणी!

नगरसेवक अभिषेक गावडे यांचे एमआयडीसीला पत्र वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार; रस्त्यावर दिशादर्शक फलकांची गरज कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील गवळदेव ते संत राऊळ महाराज महाविद्यालय या रस्त्यावर वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी दिशादर्शक व वेगमर्यादा दर्शविणारे फलक तात्काळ बसवावेत, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख तथा…

तळाशील ग्रामस्थांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच!

अनधिकृत वाळू उपसा विरोधात आंदोलन; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली भेट ग्रामस्थांच्या मागण्या आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पोहोचवणार मालवण : प्रतिनिधी     शासकीय महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पर्यावरणाची हानी होत आहे. तळाशील गावच्या अस्तित्वाला व…

कुडाळात २५ एप्रिलला विद्यार्थ्यांसाठी ‘आकाश दर्शन’ कार्यक्रम; खगोलशास्त्रातील संधींबाबत मार्गदर्शन!

‘चला कुडाळ घडवूया’ पर्व तिसरे; नगरसेवक मंदार शिरसाट यांचा विशेष उपक्रम टेलिस्कोपद्वारे चंद्र-ग्रहांचे दर्शन; विद्यार्थ्यांना विनामूल्य सहभागी होण्याची संधी कुडाळ : प्रतिनिधी      चला कुडाळ घडवूया…! पर्व तिसरे अंतर्गत कुडाळ येथे शनिवार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रामधील संधींबाबत मार्गदर्शन…

error: Content is protected !!