ठळक घडामोडी

कसाल वझरेवाडी मित्र मंडळाचा आदर्श; श्रमदानातून बंधारा बांधून अडवले पाणी!

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा कृतीतून संदेश; दुष्काळाच्या झळांवर ग्रामस्थांची ‘एकजूट’

सिंधुदुर्गनगरी : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बंधारे बांधून पाणी अडविण्याचे आवाहन केले असताना, कसाल वझरेवाडी मित्र मंडळाने श्रमदानातून बंधारा उभारून त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
     वझरेवाडी मांडाचे घर परिसरात ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून बंधारा बांधला. वझरेवाडीतील मित्र परिवाराने एकत्रितपणे बंधारा बांधण्याचा निर्णय घेत प्रत्यक्ष कृतीतून तो साकारला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीतून राबविण्यात आलेला हा उपक्रम इतर गावांसाठीही अनुकरणीय ठरत आहे.

error: Content is protected !!