

शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडेंचे विभागीय आयुक्तांना निवेदन
कुडाळ : नगरपंचायत पाणीपुरवठा उपविधी मध्ये नगरपंचायत हद्दीतील वेंगुर्लेकरवाडी येथील 26 नळ कनेक्शन धारकांच्या पाणीपट्टी दराबाबत समाविष्ट करावयाच्या राहिलेला घटक समाविष्ट करून पाणीपुरवठा व विशेष पाणीपट्टी उपनिधीस मान्यता मिळावी अशी मागणी शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी विभागीय आयुक्त नगरपालिका प्रशासन, कोकण विभाग (नवी मुंबई) यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
श्री.गावडे यांनी यात म्हटले आहे की, कुडाळ कुडाळ नगरपंचायत (पाणीपुरवठा व विशेष पाणीपट्टी) ) उपविधी 2026 महाराष्ट्र शासन राजपत्रात 23 मे 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदर उपविधीमध्ये कुडाळ नगरपंचायत हद्दीतील वेंगुर्लेकर वाडी येथील 26 नळ कनेक्शन धारकांच्या पाणीपट्टी दराबाबत समाविष्ट करावयाच्या राहिलेला घटक समाविष्ट करण्यात आलेला नाही.
सदतील वेंगुर्लेकरवाडी येथील 26 नळ कनेक्शन धारकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिपत्रक क्र.०६/२०१३ नुसार औद्योगिक क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील ग्राहकांच्या पाणी पुरवठ्याचे दर करारनामा तसेच विशेष तरतुद्वीनुसार संबंधित कार्यकारी अभियंता यांनी निश्चित केलेनुसार कुडाळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने भाषित व प्रदूषणमुक्त ग्रामपंचायतीसाठी पहिली १० वर्षासाठी रक्कम रुपये २.५० व १० वर्षानंतर रक्कम रुपये ३.०० निश्चिात केले नुसार सदरस्थितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या कार्यालयाकडून पाण्यासाठी रक्कम रुपये ३.०० ने कुडाळ नगरपंचायतीस पाणी पुरवठा केला जातो.
सदरचा पाणी पुरवठा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून केले नंतर कुडाळ न. पं हद्दीतील वेंगुर्लेकरवाडी ग्राहकांना नगरपंचायतीकडून पाणी पुरवठा केला जातो. परंतु नगरपंचायतीकडून वेंगुर्लेकरवाडी येथील नळ कनेक्शन धारकांकडून ग्रामपंचायत कालीन दराने पाणीपट्टी बिलाची आकारणी न करता मंजूर उपविधीमधील दर प्रमाणे पाणीपट्टी बिलाची आकारणी केली जाते. औद्योगिक विकास महामंडळाकडून नगरपंचायतीस रक्कम रुपये ३.०० दराने पाणी पुरवठा करते त्यामुळे उपविधीप्रमाणे ही केलेली आकारणी जास्त असल्याने प्रकल्यग्रस्तांना योग्य तो मोबदला देण्यात यावा. त्या प्रमाणे कुडाळ नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा व विशेष पाणीपट्टीच्या उपविधी संदर्भात कागदपत्रे सादर करण्यात आली असून उपरोक्त प्रमाणे नमूद अनुसूची भाग 1 (अ) मध्ये न.पं. हद्दीतील वेंगुर्लेकर वाडी येथील 26 नळ कनेक्शनधारकांच्या पाणीपट्टी दराबाबत समाविष्ट करावयाच्या राहिलेला घटक समाविष्ट करण्यासाठी व सदर नळ कनेक्शन धारक यांच्या दर आकारणीस मंजुरी मिळावी अशी मागणी अभिषेक गावडे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.









