चेंदवण हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ उत्साहात!

कुडाळ : प्रतिनिधी चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर ईशस्तवन व स्वागतगीत सुस्वरात सादर…







