कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील रहिवासी तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व धर्माजी कदम (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात शोककळा पसरली.त्यांच्या स्मरणार्थ पुण्यप्रार्थना कार्यक्रम रविवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
शांत, संयमी व मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या जाण्याने माणगाव परिसरातील एक कर्तृत्ववान व सर्वांना जोडून ठेवणारा व्यक्ती हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम माणगाव येथे शोकाकुल वातावरणात पार पडला. कृषी अधिकारी धनंजय कदम यांचे वडील तर भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा सरचिटणीस पं. ध. माणगावकर गुरुजी यांचे ते कनिष्ठ बंधू होत.









