कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहर भाजपाच्या वतीने गुरूवारी कुडाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी येथील राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, प्रदेश सदस्या तथा नगरसेविका संध्या तेरसे, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, शहराध्यक्ष सुनील बांदेकर, नगरसेवक उदय मांजरेकर, निलेश परब, नगरसेविका श्रेया गवंडे, ज्योती जळवी, माजी नगरसेवक सचिन काळप, राजू गवंडे, राजू बक्षी, अदिती सावंत, मुक्ती परब, विशाखा कुलकर्णी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









