ठळक घडामोडी

कुडाळ तहसीलदार कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी!

शिव व्याख्याते भूषण साटम यांचे शिवचरित्रावर व्याख्यान

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे आज गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
     कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील उपस्थित होते. तसेच शिव व्याख्याते भूषण साटम यांनी शिवचरित्रावर प्रभावी व्याख्यान देत उपस्थितांना प्रेरित केले.
     आपल्या भाषणात मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. न्याय, शौर्य, स्त्रीसन्मान आणि लोककल्याणकारी राज्यकारभार ही महाराजांची वैशिष्ट्ये आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवरायांच्या आदर्शांचा अंगीकार करून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रांत कार्यालय, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साही वातावरणात “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन तहसील कार्यालय, कुडाळच्यावतीने करण्यात आले.

error: Content is protected !!