ठळक घडामोडी

कुडाळ शहर शिवसेनेकडून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार!

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा गौरव सोहळा उत्साहात

शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचा पुढाकार

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने व शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या पुढाकारातून तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
      कुडाळ येथे गुरुवारी शहर शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा गौरव करण्यात आला. यामध्ये आंबड जिल्हा परिषद सदस्या दिपलक्ष्मी पडते, पावशी जिल्हा परिषद सदस्य दादा साईल, वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, घावनळे जिल्हा परिषद सदस्य दिपक नारकर, माणगाव जिल्हा परिषद सदस्य रूपेश कानडे, डिगस पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर, साळगाव पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, गोठोस पंचायत समिती सदस्य यांच्यासह अन्य सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
     यावेळी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, नगरपंचायत गटनेते तथा नगरसेवक विलास कुडाळकर, अॅड. राजीव कुडाळकर, महिला शहर प्रमुख तथा नगरसेविका सौ. श्रुती वर्दम, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, माजी नगरसेवक राकेश कांदे, उपशहर प्रमुख चेतन पडते, माजी नगरसेविका सौ. साक्षी सावंत, सौ. रेखा काणेकर, शहर शाखाप्रमुख योगेश काळप, प्रथमेश कांबळे, राजवीर पाटील, चंदन कांबळी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!