ठळक घडामोडी

कुडाळमध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी!

कुडाळ : प्रतिनिधी
     महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुडाळ तालुका शाखेच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरी करण्यात आली.
     यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे व सचिन कदम, नूतन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर व गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे, दिप्ती नाईक, शहर प्रमुख संतोष शिरसाट, एस.टी. कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, विभागप्रमुख दीपक आंगणे, सखाराम खोचरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!