Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला गॅस पुरवठ्याचा आढावा!

गॅस एजन्सी धारकांच्या समस्याही जाणून घेतल्या सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅसच्या उपलब्ध साठ्याबाबत कोणतीही गैरसमजुतीची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली गॅस वितरक यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील गॅस पुरवठ्याची सविस्तर…

महिलांना सक्षम करण्याची नव्हे, संधी देण्याची गरज –  जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा किंजवडे, कळसुली, वेताळबांबर्डे ग्रा.पं.चा आदिशक्ती ग्राम पुरस्काराने गौरव सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     आजची महिला समाजाच्या अनेक पातळ्यांवर एकाच वेळी जबाबदाऱ्या सांभाळत आहे. घर, कुटुंब, समाज आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत ती यशस्वीपणे कार्य…

कुडाळमध्ये उद्या महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन!

ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार उद्घाटन; राज्यभरातून हजारो एसटी कर्मचारी उपस्थित राहणार प्रलंबित वेतन व भत्त्यांवर ठराव; पुढील आंदोलनाची दिशा ठरणार – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी     महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी (१४ मार्च) सकाळी १०…

कुडाळमध्ये ‘जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रम उत्साहात; विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद!

आमदार निलेश राणे यांची संकल्पना; शिवसेना महिला सेनेचे आयोजन उखाणा, पाककला व ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धांनी रंगला महिला दिन सोहळा; विजेत्यांचा सन्मान कुडाळ : प्रतिनिधी     जागतिक महिला दिन निम्मित कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला आघाडी, सिंधुदुर्ग आयोजित ‘’जागर…

कसाल येथे उद्या (१४ मार्च) महसूल समाधान शिबिर!

महसूलच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी मिळणार नागरिक व विद्यार्थ्यांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी     महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार तहसील कार्यालय कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिर अभियान (टप्पा – १)’ अंतर्गत…

देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र; पण गॅस सिलिंडर बेपत्ता…!

कुडाळमध्ये ठाकरे शिवसेनेची रिकाम्या सिलिंडरांसह तहसीलवर धडक गॅस टंचाईवरून वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन कुडाळ : प्रतिनिधी      आखाती देशांतील युद्ध परिस्थितीमुळे देशभरात एलपीजी गॅस टंचाईच्या झळा बसू लागल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. कमर्शियल गॅस सिलिंडरची…

आंब्रड बाजार शाळा नं. १ मध्ये माता-पालक मेळावा उत्साहात!

विविध स्पर्धांचे आयोजन; स्मार्ट माता स्पर्धेत रुपाली कदम विजेत्या शिक्षणामुळे आयुष्याला आकार – माजी जि.प. सदस्या कल्पिता मुंज कुडाळ : प्रतिनिधी    महिलांनी शाळा आणि शिक्षणाशी असलेले नाते कायम जपावे. शाळा आणि शिक्षणामध्येच आपल्या आयुष्याला आकार देण्याचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन…

कुडाळमध्ये घरगुती गॅससाठी ग्राहकांच्या रांगा!

कमर्शियल गॅस तुटवड्यानंतर घरगुती सिलिंडरसाठी गर्दी तुटवड्याच्या भीतीने नागरिकांची धावपळ कुडाळ : प्रतिनिधी       आखाती देशांतील युद्ध परिस्थितीचा परिणाम देशभरात जाणवू लागला आहे. गॅस टंचाईच्या शक्यतेमुळे सिंधुदुर्गातही नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज (गुरूवारी) कुडाळ शहरातील खरेदी-विक्री संघाच्या गॅस वितरण…

सुट्या पैशांच्या उपलब्धतेची कुडाळ व्यापारी संघटनेची बँकांकडे मागणी!

शहरातील २६ बँकांना व्यापारी संघटनेचे निवेदन बँकांचा सकारात्मक प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज (गुरूवारी) कुडाळ शहरातील बँका तसेच पतसंस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन सुट्या पैशांची उपलब्धता त्वरित करून देण्याबाबत निवेदन दिले.      शहरातील व्यापाऱ्यांना व्यवहार करताना सुट्या…

वराड सरपंचांसह ग्रामस्थांचे रस्त्यासाठी कुडाळमध्ये लाक्षणिक उपोषण!

सावरवाड तिठा–वराड रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी     प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सावरवाड तिठा ते वराड या रस्ता सुधारणा काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. या रस्त्याच्या कामाची मुदत संपूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे तातडीने…

error: Content is protected !!