आमदार निलेश राणे यांची संकल्पना; शिवसेना महिला सेनेचे आयोजन
उखाणा, पाककला व ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धांनी रंगला महिला दिन सोहळा; विजेत्यांचा सन्मान
कुडाळ : प्रतिनिधी
जागतिक महिला दिन निम्मित कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला आघाडी, सिंधुदुर्ग आयोजित ‘’जागर स्त्री शक्तीचा” कार्यक्रम नुकताच कुडाळ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. महिलांच्या सन्मानासाठी व त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात महिला ढोलताशा पथकाच्या दमदार वादनाने झाली. पारंपरिक ढोलताशांच्या निनादात महिलांनी आपली कला आणि उत्साह दाखवून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर दिवसभर विविध सांस्कृतिक व मनोरंजनपर स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उखाणा स्पर्धा, पाककला स्पर्धा, प्रश्नमंजुषा, लकी ड्रॉ, खेळ पैठणीचा आणि नृत्याविष्कार अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांना महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना प्रोत्साहन म्हणून चांदीचे नाणे देऊन सन्मानित करण्यात आले.
पाककला स्पर्धा निकाल
प्रथम क्रमांक – गौरी चव्हाण (नेरूर)
द्वितीय क्रमांक – वनिता मुंडले (कुडाळ)
तृतीय क्रमांक – माधुरी मागाडे (कुडाळ)
उत्तेजनार्थ प्रथम – निता ओटवणेकर (ओरोस)
उत्तेजनार्थ द्वितीय – रूचिरा कोरगावकर (कुडाळ)
उखाणा स्पर्धा निकाल
प्रथम क्रमांक – सविता सुतार (कुडाळ)
द्वितीय क्रमांक – प्रतिभा सगरे (कुडाळ)
तृतीय क्रमांक – प्रन्वी हरमलकर (कसाल)
“खेळ पैठणीचा” स्पर्धा निकाल
प्रथम क्रमांक – समिक्षा शेगडे कुडाळ)
द्वितीय क्रमांक – प्राची वाळके (कुडाळ)
तृतीय क्रमांक – गितांजली निकम (कुडाळ)
सर्व विजेत्यांना बक्षिसे तसेच सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमातील लकी ड्रॉ हा देखील विशेष आकर्षणाचा भाग ठरला. यामध्ये दहा भाग्यवान विजेत्यांना मिक्सर, फॅन, कुकर, कढई, केटल आणि ५ फ्राय पॅन अशी उपयुक्त बक्षिसे देण्यात आली.व उपस्थित सर्व महिलांना सौभाग्यवाण भेट देण्यात आली.
याचबरोबर विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाने उभ्या राहिलेल्या यशस्वी महिला व युवतींचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. एकूणच, महिलांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या सामर्थ्याचा गौरव करणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध स्पर्धा, सन्मान सोहळे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उपस्थित सर्व महिलांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते व काका कुडाळकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.दीपलक्ष्मी पडते, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, जेष्ठ मार्गदर्शिका अस्मिता बांदेकर, जिल्हा बँक संचालिका नीता राणे, जिल्हा परिषद सदस्य रूपेश कानडे, नागेश आईर, दादा साईल, सुमेधा पाताडे, पंचायत समिती सदस्य अश्विनी सावंत, दिव्यानी खरात, माजी सभापती नूतन आईर, उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर,विभाग प्रमुख मृणाल परब, नगरसेवक नयना मांजरेकर, चांदणी कांबळी कुडाळ तालुका प्रमुख वैशाली पावसकर, कुडाळ शहर प्रमुख अभि गावडे,श्रुती वर्दम,माजी नगरसेवक राकेश कांदे,शिवसेना सचिव रेवती राणे,मालवण तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, मालवण उपनगराध्यक्ष दिपक पाटकर व शिवसेना पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.









