Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला अन् काळाचा घाला; पाय घसरल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू!

कुडाळ : माणगाव-आंबेरी येथील पुलानजीक असलेल्या देवकोंड परिसरात निर्मला नदीपात्रात बुडून एका ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (३१ ऑक्टोबर) दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रतिराज उर्फ राजू भार्गव कुडपकर (वय ३३, रा. वेंगुर्ला कॅम्प, भटवाडी) असे मृत…

नेरूरमध्ये ७ नोव्हेंबरला भव्य नरकासुर वध स्पर्धा!

रणझुंझार मित्र मंडळ आणि जि. प.सदस्य रुपेश पावसकर यांचे आयोजन प्रथम क्रमांकाला २० हजारांचे पारितोषिक; रुपेश पावसकर यांची माहिती कुडाळ : रणझुंझार मित्र मंडळ, नेरूर आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूर पंचक्रोशी मर्यादित ‘कलेचा देव कलेश्वर…

आकारीपड जमिनीसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्याचे श्रेय आ.निलेश राणेंनी लाटू नये- वैभव नाईक!

सिंधुदुर्ग : साधारणपणे १९७३ साला आधीपासून ‘आकारी पड’ जमिनींचा प्रश्न प्रलंबित आहे. शेतसारा न भरलेल्या जमिनींवर तत्कालीन सरकारने ‘आकारीपड’ म्हणून नोंद केली आहे. मात्र २०१६ साली शेतकरी प्रमोद शेडगे व कुडाळातील स्थानिक शेतकरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.…

कुडाळ महिला-बाल रुग्णालयाच्या फायर सिस्टीमची पाणी साठवणूक टाकी चुकीच्या ठिकाणी!

महाविकास आघाडी आक्रमक; टाकी स्थलांतरित करण्याची मागणी अभय शिरसाट, बाळा पावसकर व सुशिल चिंदरकर यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष कुडाळ : येथील महिला व बाल रुग्णालय येथे अग्निशामक यंत्रणेच्या पाणी साठवणूक टाकीचे काम चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी होत असल्याचा आरोप…

पिंगुळी पाझर तलाव अतिक्रमण विरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनास मनसेचा जाहीर पाठिंबा!

जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वात मनसैनिक आंदोलनात सहभागी होणार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची माहीती कुडाळ : पिंगुळीतील पाझर तलाव अतिक्रमण विरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा असून सोमवार २ नोव्हेंबर पासून होणा-या या आंदोलनात जिल्हाध्यक्ष…

बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य संच मिळणार; महाराष्ट्र शासनाची मंजुरी – प्राजक्त चव्हाण यांची महत्त्वाची माहीती!

पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना मिळणार २२ प्रकारच्या वस्तूंचा संच; एकूण ४९ वस्तूंचा समावेश कुडाळ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मूलभूत वस्तू संच सहाय्य योजनेला शासनाने महत्त्वपूर्ण…

कुडाळात १५ वर्षीय मुलाची राहत्या घरी आत्महत्या!

नवीन गाडी घेऊन न दिल्याच्या रागातून टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २९ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. युवराज विजय परब (सध्या रा.मेहनील प्लाझा,…

कुडाळ दर्जेदार शहर बनविण्यासह एमआयडीसीला विकसित करणार – आ.निलेश राणे!

रस्ते काँक्रीटीकरण कामांचे भूमिपूजन, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे लोकार्पण उमेद अंतर्गत महिला बचत गटांना वाहनांचे वितरण कुडाळ : मधील रस्ते काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र लोकार्पण आणि उमेद अंतर्गत महिला बचत गटांना वाहन वाटप कार्यक्रम आज कुडाळ येथे…

कुडाळ तालुक्यातील आकारी पड जमीन होणार मोकळी – आमदार निलेश राणे!

२९ गावांतील तब्बल १४४४ शेतकऱ्यांना मिळणार न्याय आ.निलेश राणेंनी मानले न्यायालयाचे आभार कुडाळ : तालुक्यातील माणगाव खोऱ्यासह २९ गावांतील तब्बल १४४४ शेतकऱ्यांच्या १७६५ हेक्टर ‘आकारी पड’ जमिनीचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न आता अखेर मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे. उच्च न्यायालयात प्रमोद…

पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा!

परशुराम उपरकर, वैभव नाईक, अमित सामंत, अभय शिरसाट यांची पत्रकार परिषदेत माहिती कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी गावातील पाझर तलाव वाचविण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, राष्ट्रवादी…

error: Content is protected !!