ठळक घडामोडी

कुडाळात १५ वर्षीय मुलाची राहत्या घरी आत्महत्या!

नवीन गाडी घेऊन न दिल्याच्या रागातून टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २९ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. युवराज विजय परब (सध्या रा.मेहनील प्लाझा, कुडाळ) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
      प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मुलाने वडिलांकडे नवीन गाडीची मागणी केली होती. मात्र, वडिलांनी गाडी घेऊन न दिल्याने आलेल्या रागातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची नोंद ३० ऑक्टोबर रोजी पहाटे १.१९ वाजता कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी पोलिसांना खबर दिली. पुढील तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भोई करीत आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!