Category बातम्या

पिंगुळीतील धुरी टेंबनगर येथे श्री रायकर मित्रमंडळाचा वनराई बंधारा!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांचे श्रमदान; भूजल पातळी वाढविण्यासाठी पुढाकार कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील धुरी टेंब नगरमधील श्री रायकर मित्रमंडळ यांच्या पुढाकारातून आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने वनराई बंधारा उभारण्यात आला. पाणीटंचाईची संभाव्य…

नवरात्रोत्सवानिमित्त वैभव नाईक यांनी सपत्नीक घेतले दुर्गा देवींचे दर्शन!

माजी आमदार वैभव नाईक यांची जिल्ह्यातील नवरात्रोत्सव कार्यक्रमांना भेट सिंधुदुर्ग : नवरात्रोत्सवानिमित्त कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख वैभव नाईक व पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध नवरात्रोत्सव मंडळांना आणि विविध देवींच्या मंदिरांमध्ये भेट…

विकास कामांच्या निधीवरून जिल्हा परिषदेच्या खास सभेत रणकंदन; विरोधकांचा सभात्याग!

‘आम्ही काय पाकिस्तानवरून आलोय?’ राजन चिके यांचा संतप्त सवाल; सत्ताधाऱ्यांकडून निधी आराखड्याला मंजुरी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत विकासकामांच्या निधीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. आधीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा हिशेब मागतानाच विकासकामांच्या यादीतून…

दामिनी पालव खून प्रकरणी कुडाळ पोलीसांकडून तपासाला वेग!

संशयिताने खूनासाठी वापरलेला चाकू आणि वाहन जप्त कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील काॅलेज युवती दामिनी किरण पालव (वय २३) हिच्या खून प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. तिचा खुन करण्यासाठी संशयित आरोपी साहिल विश्राम धुरी (वय २२,…

वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आम. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

कुडाळ : तालुक्यातील वर्दे गावातील महाविद्यालयीन युवती दामिनी किरण पालव हिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण वर्दे गावात शोककळा पसरली असून दुखद अंतःकरणाने दामिनीवर…

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून उभारलेल्या आंबेरी येथील रंगमंचाचे उद्घाटन!

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख विनायक राणे यांची उपस्थिती कुडाळ : तालुक्यातील आंबेरी येथील आंबेरी प्राथमिक शाळा येथे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून उभारलेल्या रंगमंचाचा लोकार्पण सोहळा सरस्वती पूजनच्या निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत शिवसेना तालुकाप्रमुख विनायक…

कुडाळ शहरात नगरसेवक मंदार शिरसाट यांचा जलसमृद्धीचा पुढाकार!

२१ ऑक्टोबरपासून वनराई बंधाऱ्यांच्या कामाला सुरुवात शहरात ठिकठिकाणी बंधारे उभारणार – मंदार शिरसाट कुडाळ : शहरातील भूगर्भातील पाणीपातळी वाढवण्यासाठी आणि येत्या काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या विशेष प्रयत्नांतून कुडाळ शहरात विविध ठिकाणी पाणी अडवा…

शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची भारतमाता मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवाला सदिच्छा भेट!

अध्यक्ष योगेश कुंभार यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत; २२ वर्षांची सामाजिक उपक्रमांची परंपरा कुडाळ : कुडाळ शहरातील उत्कर्षनगर येथील भारतमाता मित्रमंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव २०२६ ला शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी सदिच्छा भेट देऊन श्री दुर्गा देवीचे…

दामिनी पालव हिला न्याय मिळवून देण्यासाठी कडावल परिसरातील ग्रामस्थ एकवटले!

खून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी आज जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन देणार कुडाळ : वर्दे येथील कु. दामिनी किरण पालव हिला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. तिच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच हे…

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; कवठी येथे रक्तदान शिबिर!

२५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान कुडाळ : सध्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रक्ताचा अपुरा साठा निर्माण झाला आहे. अनेक गरजू रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रक्तासाठी करावी लागणारी वणवण लक्षात घेऊन, कवठी गावातील ग्रामस्थांनी एक आदर्श सामाजिक पाऊल उचलले…

error: Content is protected !!