
माजी आमदार वैभव नाईक यांची जिल्ह्यातील नवरात्रोत्सव कार्यक्रमांना भेट
सिंधुदुर्ग : नवरात्रोत्सवानिमित्त कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख वैभव नाईक व पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध नवरात्रोत्सव मंडळांना आणि विविध देवींच्या मंदिरांमध्ये भेट देऊन प्रतिष्ठापित केलेल्या देवींचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान व नवरात्रोत्सव मंडळांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.









