
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांचे श्रमदान; भूजल पातळी वाढविण्यासाठी पुढाकार
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील धुरी टेंब नगरमधील श्री रायकर मित्रमंडळ यांच्या पुढाकारातून आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने वनराई बंधारा उभारण्यात आला. पाणीटंचाईची संभाव्य समस्या लक्षात घेऊन मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांनी एकत्र येत हा उपक्रम राबविला.
या उपक्रमात मंडळाचे अध्यक्ष रुपेश धुरी, सचिव विनय धुरी, खजिनदार विनय येरम, तसेच शुभम धुरी, गोविंद धुरी, निलेश धुरी, गिरीधर धुरी, शंकर धुरी, राजाराम धुरी, गणेश धुरी, विराज धुरी, श्रीराम धुरी, अनिल धुरी, अक्षय धुरी, तुषार धुरी, अनंत धुरी, भरत धुरी, वैभव धुरी, नितीन धुरी, सुनील जाधव, संदीप वारंग, प्रकाश जाधव, जयवंत वारंग आणि ग्रामपंचायत सदस्य ज्योती जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत व्हावी, तसेच भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. पाणी संवर्धनासाठी ग्रामस्थांनी दाखविलेला हा पुढाकार परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.









