
कुडाळ : तालुक्यातील वर्दे गावातील महाविद्यालयीन युवती दामिनी किरण पालव हिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण वर्दे गावात शोककळा पसरली असून दुखद अंतःकरणाने दामिनीवर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दामिनीच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन तीच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. पालव कुटुंबियांच्या घरी भेट देऊन सांत्वन करत कुटूंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी ठाकरे शिवसेनेचे पप्पू पालव, संदीप सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.









